gangster killed in encounter in jail uttar pradesh chitrakut jail

कारागृहातच गँगस्टरने केले दोन खून, त्यानंतर एन्काऊंटरमध्ये झाला ठार

क्राईम देश

उत्तर प्रदेश : कारागृहात झालेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट कारागृहात ही घटना घडली. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेला एक गुन्हेगार हा बाहुबली विधायक मुख्तार अन्सारी यांचा खास माणूस होता, तर दुसरा गँगस्टर असल्याचं सांगण्यात य़ेत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, पूर्वांचलचा कुप्रसिद्ध गँगस्टर अंशु दीक्षित याला नुकतंच सुल्तानपूर कारागृहातून चित्रकूट कारागृहामध्ये हलविण्यात आले होते. तिथे त्याने केलेल्या गोळीबारात कारागृहातले कैदी मुकीम काला आणि मेराज ठार झाले. मुकीम काला हा पश्चिम उत्तर प्रदेशातला मोस्ट वाँटेड गँगस्टर तर मेराज हा नेते मुख्यार अन्सारी यांचा खास माणूस होता.

चित्रकूट कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अंशु दीक्षित याने मुकीम काला आणि मेराज या दोघांना मारल्यानंतर पाच कैद्यांना ओलीस ठेवलं होतं. त्यावेळी कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची एक टीम तिथे दाखल झाली. त्यांनी त्या कैद्यांना सोडण्याचे आवाहन केले, पण अंशु दीक्षित याने ऐकलं नाही. त्यामुळे पोलीस आणि त्याच्यात चकमक झाली आणि एन्काऊंटरमध्ये अंशु दीक्षित ठार झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत