Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason

WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू, न स्वीकारल्यास काय होईल? जाणून घ्या…

गॅझेट्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअ‍ॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत कंपनीने म्हटले आहे की, बहुतांश अ‍ॅप आणि वेबसाइट्स अशाच प्रकारची पॉलिसी ठेवतात व ते WhatsApp च्या तुलनेत अधिक डेटा जमा करतात. WhatsApp ने याबाबत ५ मे ला न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात कंपनीने म्हटले आहे की, Zomato, BigBasket, Ola, Koo, Truecaller आणि Aarogya Setu सारखे अ‍ॅप्स यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट करतात. या याचिकेत Microsoft, Google, Zoom आणि Republic TV चॅनेलच्या डिजिटल साइटचा देखील उल्लेख आहे. कंपनीने म्हटले आहे की, अनेक अ‍ॅप्स व वेबसाइटच्या प्रायव्हेसी पॉलिसीची समिक्षा केल्यानंतर हे स्पष्ट झाले की त्यांच्याद्वारे जमा केला जाणारा डेटा व्हॉट्सअ‍ॅपच्या २०२१ च्या अपडेट सारखाच आहे. तर अनेक अ‍ॅप्स यापेक्षा अधिक डेटा जमा करतात.

कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या नवीन प्रायव्हेसी पॉलिसीला मंजूरी न मिळाल्यास देशातील टेक कंपन्यांना काम करण्यास अडचण येईल. यात सर्वाधिक अडचण किराणा डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना होईल.

दिल्ली उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यातच व्हॉट्सअ‍ॅपविरोधात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेत म्हटले होते की, नवीन प्रायव्हेसी पॉलिसीला स्विकार करायचे की नाही हे यूजर्सवर अवलंबून आहे. जर एखाद्या यूजर्सला अटी मान्य नसतील व अ‍ॅपचा वापर करायचा नसेल, तर करू नये. WhatsApp च्या ऐवजी दुसरे कोणतेही अ‍ॅप वापरू शकता.

नवीन प्रायव्हेसी पॉलिसी न स्वीकारल्यास काय होईल?

  1. कंपनीने स्पष्ट केले आहे की पॉलिसी न स्विकारल्यास अकाउंट डिलीट होणार नाही, मात्र काही ठराविक फीचर्सचाच वापर करता येईल.
  2. व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ व व्हिडीओ कॉलचे उत्तर देता येईल.
  3. नोटिफिकेशन इनेबल असल्यास त्यावर टॅप करून मेसेजला उत्तर देखील देता येईल.
  4. यूजर्सला पॉलिसी स्विकारण्यासाठी वारंवार रिमाइंडर पाठवले जाईल. तरीही पॉलिसी न स्विकारल्यास इनएक्टिव्ह यूजर्सची पॉलिसी लागू होईल व १०० दिवसांनी कंपनी तुमचे अकाउंट डिलीट करेल.
  5. अकाउंट डिलीट केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बॅकअप मिळणार नाही व पुन्हा ते अकांउट सुरू करता येणार नाही.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत