सॅमसंग आज आपला गॅलेक्सी एफ सीरीजचा पहिला स्मार्टफोन Samsung Galaxy F41 लाँच करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी या फोनला ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड १० ओएअस सोबत लाँच करण्यात येणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F41 आज सायंकाळी 5:30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या लाँच इव्हेंटची लाइव्ह स्ट्रिमिंग सॅमसंग इंडियाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पाहायला मिळेल.
Samsung Galaxy F41 वैशिष्ट्ये :
- फ्लिपकार्ट टीझर अनुसार या फोनमध्ये स्लीम बेजल्स नुसार, सुपर अमोलेड इनफिनिट यू डिस्प्ले मिळू शकतो.
- फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येवू शकतो. ज्यात ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे.
- या फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
- 6000mAh बॅटरी, सुपर AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात येणार आहे.
गीकबेंज लिस्टिंगच्या माहितीनुसार, ६ जीबी रॅम सोबत Exynos 9611 SoC प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड वन यूआय सोबत येवू शकतो. चार्जिंग साठी फोनमध्ये यूएसबी सी पोर्ट दिली आहे.




