कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरातील कार कंपन्या सॅनिटायझेशनपासून ते डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर खरेदी करण्यापर्यंत सुविधा देत आहेत. आता टाटा मोर्टसने यापुढे जाऊन नवा उपक्रम सुरू केला आहे. टाटा कंपनी आपल्या नव्या कार पूर्णपणे सॅनिटाईज करून प्लॅस्टिक रॅपमध्ये देत आहे.
कार कंपन्या ग्राहकांपर्यंत कार पोहोचण्याआधी सॅनिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करतात. टाटा आता आपल्या कारला सॅनिटाईज करण्यासोबतच प्लास्टिक बबल कव्हर घालून ग्राहकांपर्यंत डिलीव्हर करणार आहे. यामुळे ग्राहकांचे कोरोनापासून रक्षण करता येईल. याची माहिती सोशल मीडियावरून देण्यात आली आहे. टाटा मोटर्सने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ तसेच फोटो शेअर केला आहे. यापोस्टसोबत कॅप्शन दिले की हे नवीन कारला किटाणूंपासून वाचवण्यास मदत करेल.
Check out the Safety Bubble – our latest addition to Sanitised by Tata Motors, ensuring your favourite cars and SUVs are shielded from germs while they await you at our dealerships. (3/3) pic.twitter.com/M7Jiyr8CmG
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) November 29, 2020