Covid Virus Has A Right To Live Says Uttarakhand Former Cm Trivendra Singh Rawat
कोरोना देश

आता बोला! माजी मुख्यमंत्री म्हणतात, ‘कोरोना विषाणूही एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार’

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाने देशात भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अशा परिस्थिती भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक अजब दावा केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्रिवेंद्र सिंह रावत ‘कोरोना विषाणूही एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे’, असं म्हणताना दिसत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले कि, “पाहिलं तर कोरोना विषाणूही एक प्राणी आहे. आपणही प्राणी आहोत. परंतु, आपण मनुष्य स्वत:ला सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो. कोरोना विषाणूची जगण्याची इच्छा आहे आणि त्याला जगण्याचा अधिकार आहे. आपण त्याच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे तो स्वतःला वाचवण्यासाठी स्वत:च रुप बदलत आहे.” दरम्यान, त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रियाही उमटत असून त्यांना ट्रोल केलं जातं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत