India v Australia team
क्रीडा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक जाहीर, पण या कारणामुळे रोहित शर्माला संघात स्थान नाही!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी IPLमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात […]

jacqueline fernandez gifts a car
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनची उदारता, स्टाफ मेंबरला कार गिफ्ट

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज तिच्या सकारात्मक विचारसरणीतून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच जॅकलिनने आपल्या स्टाफमधील एका सदस्यासाठी दसरा संस्मरणीय बनवला तेव्हा हे पुन्हा पाहायला मिळाले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जॅकलिनने तिच्या स्टाफमधील एका सदस्यास भेट म्हणून गाडी दिली आहे. जॅकलिनच्या स्टाफमधील हा सदस्य तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून तिच्यासोबत आहे. जॅकलिनने कार बुक केली तेव्हा […]

Ananya Birla
देश

आदित्य बिर्ला यांना अमेरिकी हॉटेलनं परिवारासहित अक्षरश: हाकललं, त्यांच्या कन्येनं मांडला वर्णद्वेषी अनुभव

अनन्या बिर्ला यांनी त्यांना आलेला वर्णभेदाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला. आम्हाला अमेरिकेतल्या हॉटेलने अक्षरशः हाकलून दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदित्य बिर्ला यांची कन्या अनन्या बिर्ला यांनी ट्विट करत सांगितलं कि, रेस्तराँ इटालियन रुट्सने मला आणि माझ्या कुटुंबीयांना आपल्या परिसरातून हाकलून दिले. तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे. हा वर्णभेद अत्यंत वेदनादायी आहे. This restaurant […]

Narayan Rane warns CM uddhav thakre
महाराष्ट्र मुंबई

..तर ३९ वर्षांत पाहिलेला इतिहास बाहेर काढेन – नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. राणे कुटुंबीयांना बेडूक म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राणेंनी गांडुळाची उपमा दिली. राणे कुटुंबीयांच्या वाटेला जाल तर ३९ वर्षांत पाहिलेला, अनुभवलेला सगळा इतिहास बाहेर काढेन,’ असा इशारा यावेळी राणेंनी दिला. दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे पिता-पुत्रांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी […]

Case filed against a TV actor who runs a sex racket of minors internationally
मुंबई

आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्पवयीन मुलांचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टीव्ही कलाकाराविरोधात केस दाखल

मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो(CBI)ने मुंबईतील एका टीव्ही कलाकाराविरोधात POCSO आणि IT कायद्यांतर्गत केस दाखल केली आहे. हा टीव्ही कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर सेक्स रॅकेट चालवत होता. आरोपी परदेशातील अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटोज आणि इतर बरंच काही लाच देऊन आणि ब्लॅकमेल करून इन्स्टाग्रामवरून मिळवत होता आणि ते परदेशी ग्राहकांना विकत होता. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी […]

speech of CM was uneducated and motivated by revenge- chandrakant patil
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण हे अभ्यासशून्य व सूड भावनेने प्रेरित, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात विरोधकांवर प्रचंड टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सविस्तर उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी थेट सवालही विचारला आहे की, ‘बाळासाहेबांच्या नावाने आपण अजून किती दिवस पोळ्या भाजणार आहात?’ चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य […]

Social activist set himself on fire
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगरपालिकेच्या समोर स्वतःला पेटवून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

नगरपालिकेतील ठेकेदाराविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या समोरच स्वतःला पेटवून घेतले. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भोरे हे सतत तक्रार करत होते. आठ दिवसांपूर्वी एका घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना […]

Ramdas Athavale
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही – रामदास आठवले

मुंबई : सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. आठवले म्हटले कि, सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, हे सरकार स्वतः पडणार, सरकार खुद गीर जायेगे, महाविकास आघाडी हार जायेगी अशा […]

The Micromax 'In' series
तंत्रज्ञान

मायक्रोमॅक्स ‘In’ सिरीज 3 नोव्हेंबरला भारतात होणार लॉन्च

3 नोव्हेंबर रोजी डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड मायक्रोमॅक्स स्मार्टफोनची नवीन ‘In’ रेंज भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी नवीन मायक्रोमॅक्स सिरीज विषयी बरेच तपशील समोर आले आहेत. कंपनीची या सिरीजमध्ये दोन फोन बाजारात आणण्याची अपेक्षा असून मीडियाटेक हेलियो जी 35 आणि मीडियाटेक हेलिओ जी 85 प्रोसेसरद्वारे हे चालविले जातील. स्पेसिफिकेशन्स : हेलिओ जी 35 आणि मीडियाटेक […]

Spain declares national emergency
ग्लोबल

स्पेनने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली, कोरोनाची दुसरी लाट रोखण्याचा प्रयत्न

कोरोना ने सम्पूर्ण जगाला  अक्षरशः वेठीस धरले आहे. कोरोनामुळे सर्वात खराब परिस्थिती झालेल्या देशांपैकी स्पेन हा एक देश आहे. तसेच स्पेन मध्ये आता covid १९ च्या प्रकरणांमध्ये नवीन वाढ दिसून येत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या दुसर्‍या लाटेवर अंकुश ठेवण्यासाठी स्पॅनिश सरकारने रविवारी आपत्कालीन स्थिती जाहीर केली. आपत्कालीन स्थितीमध्ये रात्रीचे कर्फ्यू देखील […]