अनन्या बिर्ला यांनी त्यांना आलेला वर्णभेदाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला. आम्हाला अमेरिकेतल्या हॉटेलने अक्षरशः हाकलून दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदित्य बिर्ला यांची कन्या अनन्या बिर्ला यांनी ट्विट करत सांगितलं कि, रेस्तराँ इटालियन रुट्सने मला आणि माझ्या कुटुंबीयांना आपल्या परिसरातून हाकलून दिले. तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे. हा वर्णभेद अत्यंत वेदनादायी आहे.
This restaurant @ScopaRestaurant literally threw my family and I, out of their premises. So racist. So sad. You really need to treat your customers right. Very racist. This is not okay.
— Ananya Birla (@ananya_birla) October 24, 2020
मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्यांनी त्या रेस्तराँच्या परिसरातही थांबू दिलं नाही. आम्हाला सगळ्यांना जेवण करण्यासाठी तीन तास ताटकळत रहावं लागलं. तरीही आम्ही रेस्तराँमध्ये थांबलो होतो. नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटर आर्यमान बिर्ला यांनीही याप्रकरणी ट्विट करत अत्यंत वाईट अनुभव आल्याचं म्हटलं आहे.