दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वीजे चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती २८ वर्षांची होती. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं. नैराश्यातून चित्राने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. चित्राचा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर हे दोघं एकत्रदेखील रहात होते. मात्र, अचानकपणे चित्राने चेन्नईतील नसरपेट […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
त्या सत्कारमूर्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून केलेला सत्कार म्हणजे…
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी मिळवला. सात कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री […]
वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या त्यांच्या अडचणी
आज राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. कोरोना महासाथीत अनेक वित्तीय संस्थांनी (बॅंका, एनबीएफसी, पतपेढ्या) वाहतूक व्यावसायिकांचं आर्थिक शोषण केलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वाहतूक व्यावसायिक संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यासंबंधी सर्व बँक आणि फायनान्स कंपन्यांना पत्र लिहित मुदत वाढीची मागणी करेन, […]
कोरोना लसीविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, लस देण्याची सर्व तयारी पूर्ण
जालना : कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी कोल्डचेन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामे पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि भारताचे औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहतोय, असे महत्त्वाचे विधान आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राजेश टोपे यांनी पुढे सांगितले कि, देशातील पाच औषध कंपन्या […]
IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा १२ रन्सने पराभव
ऑस्ट्रेलियाने अखेरचा T२० सामना १२ धावांनी जिंकला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी केली. तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेड(80) आणि मॅक्सवेल(५४) जोडीने चौफेर फटकेबाजी केली. […]
‘त्या’ पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं – शरद पवार
2010 मध्ये APMC कायद्यांविषयी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाष्य केलं आहे. कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात ते पत्र लिहिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असंही ते म्हणाले. आता जे तीन नवे कृषी कायदे आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही,’ […]
शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा
कोरोनाच्या संसर्गामुळे उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेल्या शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियेला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे ६००० पदांसाठी शिक्षण सेवक […]
अभिनेत्री क्रिती सेनॉनला कोरोनाची लागण
अभिनेत्री क्रिती सेनॉन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. क्रिती मागील आठवड्यात चंडीगडमध्ये राजकुमार रावसोबत तिच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, क्रितीने सोमवारीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. पण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
डिसले गुरुजींसारख्या शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचवणार – मुख्यमंत्री
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला. शिक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. डिसले गुरुजींप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी […]
‘ते’ पोस्टर बघितलं आणि विराटला मैदानात आली धोनीची आठवण
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कॅप्टन कूल एम. एस. धोनीने निवृत्ती घेतली असली तरी आजही धोनीला कोणीच विसरले नाही. याबद्दल एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिडनी येथील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान चाहते धोनीच्या नावाचा बोर्ड घेऊन स्टेडिअममध्ये पोहचले होते. यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं मैदानातच प्रतिक्रिया दिली होती. कर्णधार विराट कोहली सिमारेषावर क्षेत्ररक्षण करत […]










