कोरोनाच्या संसर्गामुळे उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेल्या शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियेला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे ६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियासुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मा.उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होतआहे. pic.twitter.com/0d9vmt2K1f
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) December 8, 2020