2010 मध्ये APMC कायद्यांविषयी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाष्य केलं आहे. कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात ते पत्र लिहिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असंही ते म्हणाले.
आता जे तीन नवे कृषी कायदे आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगितलं. कृषी कायद्यासंदर्भात चर्चा झाल्याशिवाय त्याबाबत काहीही भाष्य करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवत तेथून निघून गेले.