उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दुबौलिया परिसरात सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप पीडितेने या आरोपींवर केला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच चार जण १० डिसेंबर रोजी या महिलेच्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन
पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गज श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून खंचनाळे यांची तब्येत बिघडल्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीपती खंचनाळे मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले आहेत. १९५९ साली पंजाब केसरी बनता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे […]
उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, जाणून घ्या महत्वाच्या मुद्द्यांविषयी
मुंबई : विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेले आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या […]
आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
कल्याण : भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणीचा मृत्यू झाला आहे. आमदार किसन कथोरे यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे अशी माहिती मिळत आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने कल्याण तालुक्यातील दहागावजवळ एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा दुर्दैवी […]
आमदार बबनराव पाचपुते कोरोना पॉझिटिव्ह; निवासस्थानी क्वारंटाईन
नगर : माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर टेस्ट केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आहे आहेत. पाचपुते यांना कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या ते श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील घरी क्वॉरंटाईन आहेत. पाचपुते यांनी म्हटले आहे, अखेर ‘कोरोना’ने मला गाठलेच ! विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता मी […]
महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद, या मुद्द्यांवर केलं भाष्य….
मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडी सरकारने सुद्धा पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, राज्यात या सरकारने अघोषित आणीबाणी लावली आहे. देवेंद्र […]
आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
अंबरनाथ: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले असून आमदार किसन कथोरे यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून बदलापूरच्या दिशेने चालले असता वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने आमदार किसन […]
धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले […]
भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण
भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की […]
रावळपिंडी शहरात बॉम्बस्फोट, २५ जण जखमी
रावळपिंडी : पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी शहरात आज (रविवार) बॉम्बस्फोट झाला. रावळपिंडीत दहा दिवसांत झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे. शहरातील एका पोलीस स्टेशनच्या जवळ झालेल्या या बॉम्बस्फोटात २५ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका भाजीच्या गाडीवर हँड ग्रेनेड (हातबॉम्ब) फुटला. या बॉम्बस्फोटात कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले […]










