25 injured in Rawalpindi blast
ग्लोबल

रावळपिंडी शहरात बॉम्बस्फोट, २५ जण जखमी

रावळपिंडी : पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी शहरात आज (रविवार) बॉम्बस्फोट झाला. रावळपिंडीत दहा दिवसांत झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे. शहरातील एका पोलीस स्टेशनच्या जवळ झालेल्या या बॉम्बस्फोटात २५ जण जखमी झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका भाजीच्या गाडीवर हँड ग्रेनेड (हातबॉम्ब) फुटला. या बॉम्बस्फोटात कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि प्रशिक्षित कुत्र्यांच्या मदतीने परिसराची तपासणी सुरू केली आहे. परिसरात दुसरा बॉम्ब आढळलेला नाही. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे.

याआधी ४ डिसेंबर रोजी रावळपिंडीत झालेल्या एका स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. पोलीस दोन्ही बॉम्बस्फोटांचा तपास करत आहेत. या बॉम्बस्फोटांमागे काही दहशतवादी संघटनांचा हात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत