नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती म्हणाले की, “कोरोना महामारीच्या काळात होणारं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन वर्ष आणि […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शर्मन जोशीचे वडील अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन
बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीचे वडिल अरविंद जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईच्या जुहूस्थित नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शर्मन जोशी व मुलगी मानसी जोशी असा परिवार आहे. मानसी ही सुद्धा अभिनेत्री असून अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे. अरविंद जोशी गुजराती रंगभूमी कलाकार […]
अॅमेझॉनच्या अडचणीत वाढ, दिल्ली उच्च न्यायालयाच्या टिपण्णीनंतर आता ED चा अॅमेझॉन विरोधात तपास सुरु
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात तपास सुरु केला आहे. हा तपास फॉरेन एक्सचेन्ज मॅनेजमेन्ट अॅक्टच्या (FEMA) उल्लंघन प्रकरणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅमेझॉनच्या विरोधात ईडीने तपास सुरु केला आहे. या कारवाईचे निर्देश वाणिज्य मंत्रालयाकडून ईडीला देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. अॅमेझॉनच्या अडचणी वाढण्याची […]
मोठी बातमी : WhatsApp web च्या लॉगइनसाठी आता फक्त क्यूआर कोड पुरेसा नाही
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मधील एका अपडेटनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ही अपडेट अॅपच्या डेस्कटॉप लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. ही अपडेट WhatsApp Web च्या लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत यासाठी फक्त क्यूआर कोडचाच वापर करण्यात येत होता. परंतु आता युजर्सना डेस्कटॉपवर लॉगइन करतेवेळी क्यूआर कोडचा वापर करण्यापूर्वी फेस प्रिंट किंवा […]
सांगलीतील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, पोलिस निरीक्षकाच्या समावेशाने खळबळ
सांगली : सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेले हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या एका पोलिस निरीक्षकासह हॉटेल मालक, एजंट आणि इतर 3 जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन
मुंबई : लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. आई झाल्याची बातमी धनश्रीने स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. बाळ आणि ती सुखरुप असल्याचे धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनश्रीने दिलेल्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर […]
भाजपची मनधरणी फोल; अण्णा हजारे उपोषणाला बसणारच, ‘या’साठी असणार उपोषण….
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करु नये म्हणून भाजपचे अनेक नेते त्यांची मनधरणी करत होते. परंतु त्यांची ही मनधरणी फोल ठरलीय. अण्णांनी भाजपच्या आश्वाससनांकडे दुर्लक्ष करत उपोषण करणारच, असा एल्गार पुकारलाय. ३0 जानेवारी पासून उपोषणाला बसणार असे जाहीर केलंय. अण्णांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी राळेगणसिद्धीला येणार आहेत. अण्णा हजारे […]
सौरव गांगुली यांच्यावर दुसऱ्यांदा यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी, बसवण्यात आले दोन स्टेंट्स
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली. सौरव गांगुलीच्या हृदयातील धमन्यांमध्ये आणखी दोन स्टेंट्स बसवण्यात आले आहेत. गांगुली यांची 26 दिवसांत दुसऱ्यांदा हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अँजिओप्लास्टीनंतर सौरवची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ देवी शेट्टी […]
ब्रेकिंग : गाझीपूर आणि सिंघू सीमेवर मोठी पोलीस फौज तैनात, अधिकाऱ्यांना आंदोलन संपवण्याच्या सूचना
गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. पोलिसांनी आज शेतकर्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिस आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी संयुक्त कारवाई करू शकतात. यूपीच्या योगी सरकारने डीएम आणि […]
कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणने तयार केलेल्या कृषी ऊर्जा अभियान धोरण 2020 वेब पोर्टल, सौर ऊर्जा लॅण्ड […]










