Actress Dhanashri Kadgaonkar gives birth to baby boy
मनोरंजन

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन

मुंबई : लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. आई झाल्याची बातमी धनश्रीने स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. बाळ आणि ती सुखरुप असल्याचे धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनश्रीने दिलेल्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटींनीही धनश्री आणि तिच्या बाळाला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

धनश्री आपल्या पोस्ट मध्ये म्हटली कि, आज सकाळीच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. ही बातमी सांगताना मला खूप आनंद होत आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मी आणि माझे बाळ आम्ही दोघेही सुखरुप आहोत. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा अशाच कायम राहो’,असे धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत