मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आज, 23 सप्टेंबर 2025 रोजी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून कतरीनाच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितले आहे. या पोस्टमध्ये कतरीना आणि विकीने त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याच्या आनंदाची माहिती दिली आहे.
कतरिनाचा बेबी बंप असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोमुळे चाहते आनंदित झाले असून, अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
कतरिना आणि विकीने 2021 मध्ये लग्न केले होते आणि आता ते त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. या आनंदाच्या प्रसंगी, दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना त्यांच्या आयुष्यातील या नवीन पर्वाविषयी सांगितले असून त्यांनाही आनंदात सहभागी केले आहे.



