अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सुशांतच्या अंत्यविधीला हजर नव्हती. यावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आलं. मात्र एका मुलाखतीदरम्यान अंकिताने अंत्यविधीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
अंकिता म्हणाली, मी सुशांतला कधीच त्या अवस्थेत पाहू शकले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिले असतं तर मी ते चित्र कधीच विसरू शकले नसते. त्यामुळे मी त्याच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेतला होता.अंकिता पुढे म्हणते, “सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकताच मला धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुशांत असं काही करेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याच्या अंत्यविधीला मी जाऊच शकणार नव्हते. सुशांतला त्या अवस्थेत बघणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून मी अंत्यविधीला जाणं टाळलं.