पॉक्सो कायद्याबाबत वादग्रस्त निकाल देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांना मोठा झटका बसला आहे. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने हा निर्णय घेतला आहे. 13 फेब्रुवारी 2019 मध्ये न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर जानेवारी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग : आदर पुनावाला यांनी दिली आनंदाची बातमी, कोरोनाच्या आणखी एका लसीची घोषणा
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरमने अमेरिकन लस निर्माण करणारी कंपनी नोवाव्हॅक्सच्या भागीदारीत विकसित केलेली कोव्होवॅक्स जूनपर्यंत बाजारात आणण्याची आशा आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली आहे. नोवाव्हॅक्स (Novavax) बरोबर कोविड – 19 लससाठी आमची भागीदारी असून त्या लसीने चांगले परिणाम व उत्कृष्ट कार्यक्षमता देखील […]
शिवसैनिकांनी रहदारीतून मार्ग काढण्यासाठी दाखवली बंदूक, एमआयएमच्या खासदाराने शेअर केला व्हिडीओ
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका चारचाकी वाहनामधून बंदूक दाखवतानाचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बंदूक दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख /पोलीस महानिरीक्षक याची दखल घेऊ शकतात का?, अशी विचारणाही जलील यांनी केली आहे. शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीत बसलेल्या व्यक्तीने पिस्तूल बाहेर […]
विधान परिषदेच्या सभागृहात काँग्रेस नेता पाहत होता पॉर्न (अश्लील) व्हिडीओ
कर्नाटक : प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ (पॉर्न) पाहातानाची दृृष्य कॅमेरात कैद झाली आहे. सभागृहामधील कॅमेरामनने कामकाजादरम्यान काढलेल्या फोटोंमध्ये राठोड अश्लील व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. यासंर्भात राठोड यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिलं. मी इंटरनेटवर काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ डिलीट करत होतो, […]
‘त्या’ भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर होते. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच […]
मुंबईत हाय अलर्ट जारी, दिल्ली स्फोटानंतर अजित पवार यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
मुंबई : दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा इस्रायलच्या दूतावासापासून अगदी जवळ आयईडी स्फोट घडवून आणण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. खबरदारी म्हणून दिल्ली आणि मुंबई विमानतळ तसेच सर्व प्रमुख ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना देत सर्वत्र सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीत इस्रायलच्या […]
सर्वसामान्यांना कोरोना लस केव्हा मिळणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत आत्मविश्वास वाढत आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच लशीसाठी सामान्यांना फार वाट पाहावी लागणार नाही, सामान्य नागरिकांसाठी चार ते पाच महिन्यांत लस उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सामान्य नागरिकांसाठीच्या कोरोना लसीकरण मोहिमेवेळी लशीची कमतरता भासणार […]
देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मोठे यश, ‘या’ कारणामुळे अण्णा हजारे यांनी केले उपोषण स्थगित
राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती. आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी […]
सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ, तलवार लागल्याने अलीपूर पोलिस ठाण्याचे SHO गंभीर जखमी
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास काही लोकांनी येऊन घोषणाबाजी करत शेतकऱ्यांकडे तेथील आंदोलनस्थळ मोकळं करण्याची मागणी केली. ते म्हणाले की शेतकरी चळवळीमुळे लोकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. 1.45 वाजेच्या सुमारास हे लोक शेतकर्यांच्या तंबूत घुसले आणि त्यांनी आवश्यक वस्तूंची तोडफोड केली. यानंतर वातावरण टपाल आणि दोन्ही […]
मोठी बातमी : १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु
मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नियोजन करून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहेत, याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]










