सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरमने अमेरिकन लस निर्माण करणारी कंपनी नोवाव्हॅक्सच्या भागीदारीत विकसित केलेली कोव्होवॅक्स जूनपर्यंत बाजारात आणण्याची आशा आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली आहे.
नोवाव्हॅक्स (Novavax) बरोबर कोविड – 19 लससाठी आमची भागीदारी असून त्या लसीने चांगले परिणाम व उत्कृष्ट कार्यक्षमता देखील प्रकाशित केली आहे. त्यासंदर्भात आम्ही भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी अर्जही केला आहे. जून 2021 पर्यंत COVOVAX लॉन्च होईल अशी आशा आहे! अशी माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे.
Announcement of another #COVID19 vaccine, #COVOVAX from our CEO, @adarpoonawalla https://t.co/DAfyiQDNZc
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) January 30, 2021
याबद्दल सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या अधिकारीक ट्विटर हँडलवर देखील माहिती दिली आहे. आमचे CEO आदर पुनावाला यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लसीची (COVOVAX) ची घोषणा केली आहे, असं ट्विट करण्यात आलं आहे.




