Army recruitment for women

मोठी संधी : युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं लष्करात महिलांची भरती, असा करा अर्ज..

काम-धंदा देश पुणे महाराष्ट्र महिला विशेष

पुणे: महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील महिलांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण महिला अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मेल आयडीवर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरुनच अर्ज सबमिट करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

कशी असेल भरती प्रक्रिया?
ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झालं आहे. अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचं आहे. शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार पात्र ठरले असतील त्यांची संपूर्ण तपासणी करुनच भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. शारिरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना लष्करी पोलिस दलात दाखल करुन घेतलं जाणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत