मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून देखील त्यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
धक्कादायक खुलासा : चीनकडून 2015 मध्येच ‘कोरोना विषाणू’ शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार, अमेरिकेला मिळाले पुरावे
बीजिंग : चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार २०१५ मध्येच केला होता. कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्षे अगोदरच त्यांनी याबाबत चर्चा केली होती. तिसरे जागतिक महायुद्ध हे जैविक अस्त्रांचे असेल, असे भाकित देखील त्यावेळी चिनी वैज्ञानिकांनी केले होते अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे. […]
नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, काय सुरु आणि काय बंद राहणार, जाणून घ्या..
नाशिक : नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे या कालावधीत १२ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. किराणा माल, दूध, बेकरी आणि मिठाई दुकाने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यातून औषध, […]
घरोघरी जाऊन लसीकरण का करत नाही? सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण…
नवी दिल्लीः कोरोनाची रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय उरल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. नागरिकांना कमीत कमी प्रवास करून, जनजागृती अभियान राबवून देशव्यापी पातळीवर नागरिकांचे घरीच जाऊन लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला होता. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. […]
कोरोनातून बरे झाल्यानंतर करा ‘या’ चाचण्या, अन्यथा उद्भवू शकतात समस्या, जाणून घ्या का आहेत महत्वाच्या…
देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात विनाश करीत आहे. दररोज लाखो कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्णही बरे होत आहेत. आरोग्य तज्ञांनी अलीकडेच कोरोनातून बऱ्या झालेल्या सर्वांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. डॉक्टरांनी कोरोनातून बरे झालेल्या सर्व रूग्णांना लसीकरण व पोस्ट रिकव्हरी चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी […]
रुग्णांवर दुपारपर्यंत उपचार केले, त्यानंतर काही तासातच झाला डॉक्टरांचा मृत्यू
दिल्ली : डॉ. अनस मुजाहीद (26) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. ते दिल्लीतील गुरू तेग बहादूर रुग्णालयात कार्यरत होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या काही तासांच्या आता झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. डॉ. अनस मुजाहीद यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली. त्यानंतर ते […]
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियूष चावला याच्या वडिलांचे कोरोनाने निधन
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियूष चावला याच्या वडिलांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले. पियूष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, कोरोनामुळे गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांना वाचवण्यात यश आले नाही आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पियूष चावलाने त्याच्या […]
कैरी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…
उन्हाळ्याच्या मौसमात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात येणारा आंबा सर्वांनाच आवडतो, पण पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. उन्हाळ्यातील हे मुख्य फळ आहे. कैरीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. कैरीमध्ये जीवनसत्त्व -ए, सी आणि ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखी पोषक द्रव्ये आढळतात. चला […]
शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन
नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज चेतन साकरियाच्या वडिलांचं कोरोनाने निधन
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं आहे. चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गुजरातच्या भावनगरमधील एका खाजगी रुग्णायलयात उपचार सुरु होते. तिथेच आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेतन साकरियाने आठवड्यापूर्वी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं […]










