मुंबई : यावर्षी IPL २०२१ स्पर्धा बायो-बबलमध्ये कोरोनाच्या शिरकावामुळे 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) ऑलराऊंडर सॅम करन याने खूप चांगली कामगिरी केली. मात्र, त्याच्या वयावरून खूप वेळा त्याला ट्रोल करण्यात येतं. IPL २०२१ स्थगित झाले असले, तरी अनेक मिम्स व्हायरल होत असतात. त्यातच आता सॅम करनचा एक फोटो प्रचंड […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अन.. जीव भांड्यात पडला.. अखेर ‘ते’ अनियंत्रित रॉकेट अरबी समुद्रात कोसळले
नवी दिल्ली : चीनचे अनियंत्रित झालेले रॉकेट अखेर कोसळले आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी समुद्रात कोसळल्याचे वृत्त आले आहे. या रॉकेटचे बहुतेक घटक पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर नष्ट झाले होते. आता हे रॉकेट समुद्रात कोसळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. 29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात […]
अभिनेता सूरज थापर ICU मध्ये दाखल, मालाडमधील रुग्णालयात उपचार सुरु
नवी दिल्ली : अभिनेता सूरज थापर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मुंबईतील सर्व शूटिंग बंद असल्यामुळे सूरज थापर ‘शौर्य और अनोखी’ या मालिकेच्या शूटिंगसाठी दररोज मुंबई- गोवा प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज यांना तीन दिवसांपासून हलका ताप येत होता. सूरज थापर गोव्याहून मुंबईला परत आले तेव्हा त्यांची तब्येत अचानक […]
COWIN पोर्टलवरून लसीची नोंद करणाऱ्यांसाठी आता ‘हा’ कोड आवश्यक, जाणून घ्या..
नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. या लसीसाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कोविन पोर्टल (CoWin Portal)वर एक खास नवीन फीचर जोडले गेले आहे. आता युजर्संना सिक्योरिटी कोड पाठवले जात आहे. आता या कोडविना कोविन पोर्टलवरून लस बुक करणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लस घेतेवेळी हा कोड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय […]
काबूलमधील एका शाळेजवळ बॉम्बस्फोट, 25 ठार, ५२ जखमी
अफगाणिस्तान : पश्चिम काबूलमधील एका शाळेजवळ आज बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात 25 जण ठार झाले, त्यापैकी अनेकजण तरुण विद्यार्थी आहेत. तर ५२ जण जखमी झाल्याची माहिती अफगाण सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. सय्यद अल-शाहदा शाळेजवळ झालेल्या या स्फोटात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी येथे रुग्णवाहिकांची गर्दी झाल्याचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक आर्यन यांनी सांगितले. […]
दिलासादायक : DRDO च्या 2-DG औषधाला DGCI ने दिली मंजुरी, औषधाचे ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे
नवी दिल्ली : ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (DGCI) ने DRDO च्या आणखी एका औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही एक दिलासादायक बातमी आहे. DRDO च्या या औषधाला सध्या ‘2-DG’ (2 deoxy D Glucose) असं नाव देण्यात आलंय. DRDO च्या ‘इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ (INMAS) तसंच हैदराबाद […]
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन, केली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध चांगले प्रयत्न करत असल्याचे म्हणत कौतुक देखील केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा मुद्दा पंतप्रधांनापुढे मांडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला ऑक्सिजनच्या बाबतीत […]
ICMR कडून नवीन नियमावली जाहीर, प्रवासासाठी आता RT-PCR चाचणी अनिवार्य नाही, पण…
नवी दिल्ली : आंतरराज्य प्रवासासाठी RT-PCR चाचणी करणे अनिवार्य नसल्याची सूचना इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जारी केली आहे. ही सूचना पूर्णपणे स्वस्थ असलेल्या नागरिकांसाठीच आहे. मात्र, ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत, त्यांनी प्रवास टाळावा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टेस्ट लॅबवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे. एकदा RT-PCR किंवा RAT […]
कंगना रानौतला कोरोनाची लागण, म्हणाली, मी त्याचा नाश करीन… हर हर महादेव
मुंबई : कंगना रानौतला कोरोनाची लागण झाली आहे. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली आहे. ती सध्या विलगीकरणात असून डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. कंगनाने इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले कि, “गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखे वाटत होते, अशक्तपणा जाणवत होता, आणि माझ्या डोळ्यांत जळजळ होत होती, त्यामुळे हिमाचलला जाण्यापूर्वी कोरोना […]
मोठी बातमी : यूकेसाठी ठेवलेले कोव्हीशील्ड लसीचे ‘ते’ ५० लाख डोस आता भारतात वापरणार
केंद्र सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. यूकेला पाठवण्यासाठी ठेवलेले कोव्हीशील्ड लसीचे ५० लाख डोस आता एक्स्पोर्ट केले जाणार नाहीत. त्याऐवजी या लसींचा वापर देशात सुरू करण्यात आलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमात केला जाईल. कोव्हीशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे केली जात आहे. या संस्थेचे शासन व नियामक […]










