Corona vaccination campaign across the country from today
कोरोना देश

दिलासादायक : DRDO च्या 2-DG औषधाला DGCI ने दिली मंजुरी, औषधाचे ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे

नवी दिल्ली : ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (DGCI) ने DRDO च्या आणखी एका औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही एक दिलासादायक बातमी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

DRDO च्या या औषधाला सध्या ‘2-DG’ (2 deoxy D Glucose) असं नाव देण्यात आलंय. DRDO च्या ‘इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ (INMAS) तसंच हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्रितपणे हे औषध तयार केलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी लॅबला देण्यात आली आहे.

हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी ठरलं आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला ते लवकरात लवकर आजारातून बरे झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. सोबतच रुग्णांची ऑक्सिजनची गरज या औषधामुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं आढळून आलं. या औषधाचा वापर कोरोना रुग्णांवर करण्यात आल्यानंतर त्यांच्यात इतर कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कमी वेळेत परिणाम दिसून येत आहे. या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. रुग्णाच्या शरीरातील संक्रमित पेशी शोधून काढून विषाणूला आळा घालण्यासाठी हे औषध उपयोगी आहे. कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे. यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी 2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे.

डीआरडीओच्या वैज्ञनिकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधावर काम सुरु केलं होतं. यावेळी कोरोनावर हे औषध अत्यंत प्रभावशाली असल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. या आधारे DCGI ने मे 2020 मध्ये या औषधाच्या फेज 2 ट्रायलला मंजुरी दिला होती. 2DG औषधाच्या ट्रायलचा पहिला टप्पा सहा रुग्णालयांमध्ये घेण्यात आला आणि देशभरातील 11 रुग्णालयात फेज (डोस रेंज) क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात 110 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत