Actor Suraj Thapar admitted to ICU
मनोरंजन

अभिनेता सूरज थापर ICU मध्ये दाखल, मालाडमधील रुग्णालयात उपचार सुरु

नवी दिल्ली : अभिनेता सूरज थापर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मुंबईतील सर्व शूटिंग बंद असल्यामुळे सूरज थापर ‘शौर्य और अनोखी’ या मालिकेच्या शूटिंगसाठी दररोज मुंबई- गोवा प्रवास करत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज यांना तीन दिवसांपासून हलका ताप येत होता. सूरज थापर गोव्याहून मुंबईला परत आले तेव्हा त्यांची तब्येत अचानक खराब झाली, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

सूरज थापर यांची बहीण वनिता थापर यांनी सांगितले की, सूरजचा कोविड अहवाल अद्याप आलेला नाही. सूरजला मुंबईत येताच तीव्र ताप आला आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होऊ लागली, त्यानंतर त्याला त्वरित आयसीयूमध्ये दाखल केले. त्यांना मालाडमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सूरज स्वत: च्या आरोग्याबद्दल खूप जागरूक आहे. ते वेळोवेळी आपला आहार आणि फिटनेस तपासत राहतो. सूरजने विविध टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘ससुराल गेंदा फूल’, ‘एक रिश्ता सांझेदारी का, हम पाच फिर, एक नई जंग आणि इतर अनेक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये त्यांनी काम केले असून ते प्रेक्षकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sooraj Thapar (@soorajthapar)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत