ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं असल्याचं समजतं आहे. बडोला यांनी बर्याच टीव्ही सीरिअल आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.
मोहन बडोला यांचे काल (सोमवार) रात्री उशीरा त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. बडोला यांनी एक व्यावसायिक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु नंतर ते कला जगताकडे वळले आणि दिल्लीतील थिएटरमध्ये काम करण्यास त्यांनी सुरवात केली. बडोला यांनी आकाशवाणीसाठी चारशेहून अधिक नाटकांची निर्मिती केली.
विश्व मोहन बडोला यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटासह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी गोवारीकर यांच्या २००८ साली प्रदर्शित झालेल्या‘जोधा अकबर’ या चित्रपटामध्ये आणि राजकुमार हिरानी यांच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये देखील काम केले होते. तसेच त्यांनी जॉली एलएलबी चित्रपटात अक्षय कुमारच्या वडिलांची भूमिका साकारली होती. बडोला यांचा मुलगा आणि अभिनेता वरुण बडोला यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून वडिलांच्या निधनाची बातमी दिली.
View this post on Instagram