दुबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं. सोनालीने तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी दुबईत ४ जणांच्या उपस्थितीत लग्न केलं. तिच्या लग्नाला तिचे आई- बाबा आणि कुणालचे आई- बाबाही नव्हते. ७ मे रोजी दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्न केलं. सोनाली आणि कुणाल जुलै महिन्यात विवाहबद्ध होणार होते. मात्र दोघांनी अचानक मे महिन्यातच लग्न केलं. सोनालीने स्वतः […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
श्री साईबाबा विश्वस्त संस्थानने सुरु केला ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प
अहमदनगर : श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. […]
प्रसिद्ध गायक केव्हिनचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, दोन आठवड्यांपूर्वीच केलं होतं लग्न
ब्राझील : ब्राझीलचा प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय केविन ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील हॉटेलमध्ये थांबला होता. ही घटना 16 मे रोजी घडली. पोलिसांनी केव्हिनच्या पाचव्या मजल्यावरून पडण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. केव्हिन हॉटेलच्या 11 व्या मजल्यावर […]
धक्कादायक : रुग्णालयात उंदराने कुरतडला 19 दिवसांच्या बाळाचा पाय
इंदौर : मध्य प्रदेशमधील इंदौर शहरातील एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाचा पाय कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुतरडल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे. महाराजा यशवंतराव चिकित्सालयचे अधीक्षक प्रमेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये लहान मुलांची देखभाल करण्यासाठी जो […]
ग्रामीण डाक सेवक पद भरती, दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी मोठी संधी
मुंबई : पोस्ट विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक भरती सुरु होणार आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)/ ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण २,४२८ पदांची भरती सुरु आहे. (अजा-१९१, अज-२४४, इमाव-५६५, इडब्ल्यूएस-२४६, दिव्यांग(ए)- १०, दिव्यांग(बी)- २३, दिव्यांग (सी)-२९, दिव्यांग (डी ई)-१५, खुला-११०५) […]
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर कोणाचा दबाव? ‘त्या’ कथित गोळीबार प्रकरणाचं पुढे काय?
पिंपरी चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पिंपरी चिंचवडमधील आमदार अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर आमदारांवर गुन्हा दाखल करणार का? मात्र, या प्रश्नाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आता नवीन विषयाला तोंड फुटलं आहे. कृष्ण प्रकाश यांची नेहमीची गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा दिसली […]
मुंबईच्या समुद्रात अडकलेले भारतीय जहाज P-305 बुडाले, 130 पेक्षा अधिकजण बेपत्ता
मुंबई : मुंबईपासून 175 कि.मी. अंतरावर असलेल्या हीरा ऑईल फील्ड्सजवळ तौक्ते वादळात अडकलेले भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडाले आहे. भारतीय नौदलाने त्याच्यातील 146 लोकांना वाचवलं आहे, तर 130 पेक्षा अधिकजण बेपत्ता आहेत. या ठिकाणी आणखी एक भारतीय जहाज अडकले आहे. त्यात 137 लोक असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी 38 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. […]
पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दिल्लीतील एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी […]
दोन मोटारसायकल समोरासमोर धडकून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
फरीदकोट : पंजाबच्या फरीदकोटमधील भोलूवाला रोडवर अतिशय भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मोटारसायकल चालक ठार झाले असून दुचाकीवर बसलेला एक छोटा मुलगा बचावला आहे. विशेष म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा पूर्ण रस्ता रिकामा होता. हा अपघात इतका भयंकर होता की जगदीप सिंह (वय 27 वर्ष) आणि किक्करसिंह (वय ४५) हे जागीच मरण पावले. हा […]
मोठी बातमी : RBI ने दिली महत्वाची सूचना, ‘या’ दिवशी NEFT सुविधा राहणार बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी एक अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार रविवारी (23 मे) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सुविधा 14 तास बंद असणार आहे. बँकिंग नियामकाने अधिसूचनेत म्हटले आहे की शनिवारी (22 मे) बिझनेसची वेळ संपल्यानंतर, NEFT सुविधा तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड करून कार्यक्षमता आणि लवचीकता वाढविण्यासाठी हे करण्यात येणार आहे.” त्यानुसार, रविवारी (23 मे 2021) […]










