Who put pressure on Commissioner of Police Krishna Prakash? What's next for 'that' alleged shooting case?

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर कोणाचा दबाव? ‘त्या’ कथित गोळीबार प्रकरणाचं पुढे काय?

पुणे महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पिंपरी चिंचवडमधील आमदार अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर आमदारांवर गुन्हा दाखल करणार का? मात्र, या प्रश्नाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आता नवीन विषयाला तोंड फुटलं आहे. कृष्ण प्रकाश यांची नेहमीची गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा दिसली नाही, त्यामुळे त्यांच्यावर राज्य सरकारमधील कोणाचा दबाव आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाला आज सात दिवस पूर्ण होतील, तरी देखील हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेपर्यंत पोलीस पोहचू शकलेले नाहीत. यामागे काय कारण आहे? हा त्याच दबावाचा परिणाम तर नसेल ना? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. अण्णा बनसोडे यांनी 12 मे रोजी त्यांच्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला होता. हा गोळीबार तानाजी पवारने केला असं त्यांनी सांगितलं होतं. पण गोळी कोणाला लागलीच नाही. गोळीची खून घटनास्थळी कुठेच आढळलेली नाही. दुसरीकडे तानाजी पवारने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचं जबाबात म्हटलं आहे. त्यातून अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असं निष्पन्न झालं तर पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना विचारला. पण यावर पोलीस आयुक्त म्हणाले की, ही पत्रकार परिषद वेगळ्या विषयासाठी आहे. अद्याप मुख्य आरोपी जेरबंद केलेले नाहीत. मी तपास पूर्ण झाल्याशिवाय कधीच कुठल्या घटनेबाबत भाष्य करत नाही.

दोन मोटारसायकल समोरासमोर धडकून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश नेहमीच गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतात, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा करतात, त्यामुळे त्यांनी वापरलेली ही भाषा मात्र वेगळीच होती. त्यामुळे या प्रकरणात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान, या घटनेनंतर हे प्रकरण पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे असल्यामुळे काहीतरी सकारात्मक होईल, अशी अशा अनेकजण व्यक्त करत होते. त्यामुळे आता पोलीस आयुक्त या प्रकरणाचा कसा उलगडा करतील, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत या प्रकरणात केवळ गोळीबाराचा आरोप असलेला तानाजी पवार आणि आमदारांच्या चार समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे. पोलीस अद्याप अण्णा बनसोडे यांचा मुलगा आणि त्यांच्या पीएपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

आमदार बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण, पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती

भयंकर : दारूच्या नशेत केली अनोळखी व्यक्तीची हत्या, अगोदर गळा आवळला नंतर चिरला, मग जिवंत जाळलं

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत