पुणे : हैदराबादमधील दीप्ति नारकुतीला मायक्रोसॉफ्टने २ कोटी रुपये वार्षिक पॅकेज दिले आहे. दीप्ति आता मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणार आहे. अमेरिकेत टेक जाएंटच्या हेडक्वॉर्टर Seattle मध्ये काम करणार आहे. दीप्ति नारकुतीने नुकतेच एमएस कम्प्यूटर्सचे शिक्षण यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडामधून पूर्ण केले आहे. मायक्रोसॉफ्ट शिवाय, दीप्तिला गोल्डमॅन सॅक्स आणि अॅमेझॉनकडून जॉब ऑफर आली आहे. परंतु, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
RTPCR चाचणीसाठी नाक आणि तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही, वापरणार ‘ही’ सोपी पद्धत
नागपूर : कोरोना चाचणी करवून घेण्यासाठी RT PCR चाचणी करावी लागते, त्यासाठी नाक आणि तोंडातील स्वॅब घेतला जातो. मात्र नाकातून आणि तोंडातून हा स्वॅब घेणं ही प्रक्रिया त्रासदायक असते. यावर आता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) उपाय शोधला आहे. आता सलाइनच्या पाण्याने गुळणी केल्यास व हेच पाणी सॅम्पल म्हणून संकलित केल्यास त्याद्वारे चाचणी केली […]
‘लिव्ह इन रिलेशनशीप’ अस्वीकारार्ह, जोडप्याला सुरक्षा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
चंदीगड : पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशीप नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह असल्याचं देखील उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. गुलजा कुमारी (19) आणि गुरविंदर सिंह (22) यांनी सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाकडे मदत मागितली होती. याचिकाकर्त्यांचे वकील जे एस ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणी गेल्या […]
धक्कादायक : भाजपाचे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलीसमवेत आत्महत्या
जळगाव : भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली आहे. त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. राजेंद्र रायभान पाटील (वय ५४), पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय […]
क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लस घेतली, पण सुरु झाला नवा वाद
भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतू त्याने लस घेतल्याचा फोटो जेव्हा सोशल मीडियावर टाकला, तेव्हा वेगळीच चर्चा सुरु झाली असून नवा वाद निर्माण झाला आहे. फिरकीपटू कुलदीप हॉस्पिटलऐवजी गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लस घेताना दिसून आला. त्यामुळे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर फोटो शेअर केला आणि ट्वीट […]
तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत करा, विजय वडेट्टीवार यांचे निर्देश
मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पडझड झालेल्या घरांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते […]
पंतप्रधान चुकून म्हणाले पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या, काँग्रेसने केली घणाघाती टीका
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल (१८ मे) कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणच्या ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकून ‘पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवा’ असं म्हटलं होतं. त्यांचा हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगानं […]
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील एकमेव कोरोना चाचणी लॅब उद्धवस्त
गाझा : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान असलेला तणाव चिघळत चालला आहे. हमासकडून रॉकेट हल्ले सुरु असून इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील एकमेव कोरोना चाचणी प्रयोगशाळा उद्धवस्त झाली आहे. या हल्ल्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. इस्रायलच्या हल्ल्यात कोरोना चाचणी प्रयोग शाळा […]
युवक आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला आणि अनर्थ घडला…
गडचिरोली : एका २५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (१८ मे) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास प्राणहिता नदीच्या घाटावर घडली. तो मित्रांसोबत आंघोळीसाठी प्राणहिता नदीपात्रात गेला होता. राहुल नारायण सोयाम (२५) रा.जिमलगट्टा, ता. अहेरी असे मृतक युवकाचे नाव आहे. राहुल नारायण सोयाम हा युवक आपल्या पत्नीसह सिरोंचा येथे राहात होता. तो सिरोंचा […]
टोकिओ ऑलिंपिक सुरु होण्यास फक्त १० आठवडे, डॉक्टरांच्या असोसिएशनने केली ‘ही’ विनंती
टोकिओ : ऑलिंपिकला सुरुवात होण्यास फक्त १० आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील नागरिकांनी ऑलिंपिक आयोजनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच आता जपानमधील डॉक्टरांच्या एका मोठ्या असोसिएशनने ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. याआधी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी देखील कोरोना संसर्गामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली […]










