स्वात (पाकिस्तान) : एका १९ वर्षीय युवकाने शॉर्ट व्हिडिओ बनवण्याच्या नादात आपले प्राण गमावले आहेत. आत्महत्येचा व्हिडिओ चित्रीत करत असताना बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानमधील स्वातमधील कबाल तालुक्यात ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉक स्टार हमीदुल्लाह हा युवक टिकटॉक व्हिडिओ बनवत होता. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण
चंदिगड : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या चंदिगडमध्ये त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत. फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग 91 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिल्खा सिंग यांच्या घरातील एका कर्मचाऱ्याला ताप आला होता. त्यामुळे बुधवारी तात्काळ मिल्खा सिंग यांनी कोरोना […]
अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन
कोलकाता : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्या आईचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अरिजितच्या आईला कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज (20 मे) सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अरिजीत सिंग यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु होते, परंतु तिची परिस्थिती सुधारत नव्हती. आज 20 […]
श्वेताचे दुर्दैव आहे की… राजा चौधरीची श्वेता आणि अभिनव यांच्यातील भांडणावर प्रतिक्रिया
मुंबई : टीव्ही स्टार श्वेता तिवारी आणि तिचा दुसरा नवरा अभिनव कोहली वेगळे राहतात. लग्नात अपयश आल्यानंतर ते दोघेही त्यांचा मुलगा रेयांश याचा ताबा मिळण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. आता या भांडणानंतर यावर श्वेता तिवारीचा पहिला नवरा राजा चौधरी याने प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच अभिनवने श्वेतावर आरोप केला होता की रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी […]
कंगना रनौतने केले अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक, म्हणाली…
‘द फॅमिली मॅन 2’ चा ट्रेलर पाहिल्यानंतर कंगना रनौतने दाक्षिणात्य अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक केले आहे. मनोज बाजपेयी आणि सामन्था अक्किनेनी स्टारर वेब सीरिजचा ट्रेलर काल 19 मे रोजी प्रदर्शित झाला होता. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते मनोज आणि सामन्था यांचे त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुक करीत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कंगनाने या वेब सीरिजमध्ये सामन्थाने केलेल्या अभिनयाचे […]
दहावी आणि ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पश्चिम रेल्वेत हजारो पदांवर अप्रेंटिसशिप भरती
Railway Recruitment २०२१ : दहावी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण केलेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मुंबईने फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनीस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वायरमन, पाइप फिटर, प्लंबरसह अन्य विविध प्रकारच्या हजारो पदांवर अप्रेंटिसशिप भरतीसाठी जाहिरात दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या कार्यकक्षेत विभिन्न विभागांच्या वर्कशॉपमध्ये एकूण ३,५९१ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. वेस्टर्न […]
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. ते ८९ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी पहाडिया यांना कोरोनाची लागण झाली होती. गुडगावच्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]
‘भय इथले संपत नाही’ : आता पांढर्या बुरशीचे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ
पाटणा : काळी बुरशी (म्यूकरमायकोसिस) नंतर आता पांढर्या बुरशीचे रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काळ्या बुरशीच्या तुलनेत अधिक घातक मानली जाणारी पांढरी बुरशी या आजाराचे चार रुग्ण सापडले आहेत. पांढरी बुरशी (कॅन्डिडोसिस) फुफ्फुसांच्या संसर्गाचे मुख्य कारण आहे. फुफ्फुसांव्यतिरिक्त ते त्वचा, नखे, तोंडातील अंतर्गत भाग, पोट आणि आतडे, मूत्रपिंड, जननेंद्रिय आणि मेंदू इत्यादींना देखील संक्रमित […]
‘तुला मुलीच होतात’ असे म्हणत केली पत्नीची हत्या, सात वर्षांच्या मुलीने दिली वडिलांविरोधात साक्ष आणि..
जळगाव : पत्नीचा लाकडी दांडा डोक्यात मारुन खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने काल (१९ मे) जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पप्पू रतन पवार (वय ३१ रा. पाचोरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी कस्तुराबाई पप्पू पवार (वय ३०) यांचा खून केला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या आरोपीच्या […]
SBI च्या डेटा अॅनालिस्ट आणि फार्मसिस्ट भरती परीक्षा लांबणीवर
स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) डेटा अॅनालिस्ट आणि फार्मसिस्ट भरती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार होती. परीक्षेच्या सुधारित तारखा कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केल्या जातील. भारतीय स्टेट बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ‘कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, २३ मे २०२१ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. […]










