sbi
अर्थकारण काम-धंदा देश

महत्वाची बातमी : SBI बँकेत खाते असल्यास त्वरित पूर्ण करा महत्वाचे व्यवहार, अन्यथा…

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये जर तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आपल्याला जर एखादा महत्वाचा व्यवहार करायचा असेल, तर तो त्वरित पूर्ण करा, कारण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ची डिजिटल बँकिंग सेवा आज रात्री काही तास उपलब्ध असणार नाही. यावेळी आपण एसबीआयच्या इंटरनेट बॅकिंग सेवा, योनो, योनो लाइट […]

due date for itr filing for the year 2020 21 is extended
अर्थकारण काम-धंदा

मोठी बातमी : करदात्यांना मोठा दिलासा, CBDT ने वाढवून दिली प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत

नवी दिल्ली :  आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. प्राप्तिकर अधिनियम, १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड प्राप्तिकर विवरणपत्र […]

Actor Hemant Joshi dies due to corona
मनोरंजन

‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे १९ मे रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशी यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. हेमंत जोशी यांनी ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेत भावेंची भूमिका साकारली. हेमंत जोशी यांनी जवळपास दोन दशके नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम केलं. त्यांनी नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, तेंडल्या, […]

brazilian singer mc kevin falls to death
ग्लोबल

गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…

ब्राझील : प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा काही दिवसांपूर्वी पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. मात्र, आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. केव्हिन गॅलरीत एका मॉडेलबरोबर रोमान्स करत होता, त्यावेळी अचानक त्याची पत्नी तेथे आली आणि घाबरल्यामुळे केव्हिन पाचव्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वीच केव्हिनने त्याची मैत्रीण डियोलेन बेजेराशी लग्न […]

environmentalist Sunderlal Bahuguna dies due to corona
देश

दुःखद : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

ऋषिकेश : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे आज दुपारी १२ वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ऋषिकेश येथे दाखल झालेल्या पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना कोविड न्यूमोनिया झाला होता. CPAP मशीन […]

Indian Air Force MiG-21 Bison plane crashes
देश

वायुसेनेचं लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त, वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू

चंदीगढ : भारतीय वायुसेनेचं MIG -२१ लढाऊ विमान गुरुवारी रात्री उशिरा दुर्घटनाग्रस्त झालं. नियमित प्रशिक्षण सुरु असताना पंजाबमधील मोगाजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेबाबत वायुसेनेनं दु:ख व्यक्त केलं आहे. वेस्टर्न सेक्टरमध्ये काल रात्री बायसन एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं. वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा यामध्ये मृत्यू […]

A Ship sunk In The Sea Near The 'Heera Oil Fields; More Than 130 Still Missing
महाराष्ट्र मुंबई

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अरबी समुद्रात पी -305 जहाज बुडाले आणि त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी जहाजाच्या कॅप्टनसह अनेक व्यक्तींविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. पोलिसांनी कॅप्टन राकेश बल्लभ आणि इतरांविरूद्ध कलम 3०4 (२), 38 आणि 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबईतील यलो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Tarun Tejpal Acquitted of Rape Charges by Goa District Court
देश

ब्रेकिंग : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची 8 वर्षानंतर बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्तता

गोवा : उत्तर गोव्यातील मापुसा येथील जिल्हा व सत्र कोर्टाने शुक्रवारी पत्रकार तरुण तेजपाल यांना 2013 मधील बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्त केले. तहलकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्यावर 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता […]

Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार, कारागृहात केले असे काही…

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या कारागृहात आहे. पण कारागृहातच बाळ बोठे याने असे काही केले आहे की त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारागृहात बोठेने मोबाईलचा वापर केल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ […]

Cricketer Bhuvneshwar Kumar's Father Dies In Meerut
क्रीडा

ब्रेकिंग : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन

मीरत (उत्तर प्रदेश) : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन झाले आहे. भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंग हे यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर सर्व प्रकारचे इलाज करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. कुटुंबीयांनी त्यांना गंगानगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणले होते. तिथेच त्यांनी […]