Two people fell as plane took off from kabul airport
ग्लोबल

भयंकर VIDEO : काबुल सोडण्यासाठी लोकांनी स्वतःला विमानाच्या चाकांना बांधून घेतले, टेक-ऑफ नंतर खाली कोसळले…

काबूल : तालिबानने देश ताब्यात घेतल्याने अफगाणिस्तान सोडण्यासाठी हजारो अफगाणी नागरिक काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अराजकतेचे वातावरण आहे. काबूलमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. इथल्या प्रत्येक परदेशी व्यक्तीला बाहेर जायचे आहे. यामुळेच काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी जमली आहे. काबूल विमानतळ सध्या अमेरिकी सैन्याच्या ताब्यात आहे, पण प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती अनियंत्रित झाली […]

Government of Maharashtra announces Outstanding Journalism Award
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 14 : राज्य शासनाच्या वतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे […]

man and woman attempt suicide outside supreme court gate
देश

सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोर एक महिला आणि पुरुषाने स्वत:ला पेटवून घेतले, आत्महत्येचा प्रयत्न…

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोर स्वत:ला पेटवून घेत दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी गेट क्रमांक डी मधून आत जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ओळखपत्राशिवाय आत जाण्यापासून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यानंतर, या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटजवळ स्वत:ला पेटवून […]

multiple credit cards what are its advantages and disadvantages how to use multiple credit card together
अर्थकारण देश

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरताय? अनेक क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करावा? जाणून घ्या…

नवी दिल्ली : तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असल्यास, त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. अनेक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्हाला काही वेळा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर कार्डधारकांनी कार्डवर सतत नजर ठेवली नाही, तर ते कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की जर आपल्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असतील, तर त्यांचा योग्य वापर करणे […]

earthquake shakes Haiti
ग्लोबल

हैती देशात 7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप, आतापर्यंत 724 जणांचा मृत्यू तर 2800 जण गंभीर जखमी

हैती : हैती या कॅरेबियन देशात 7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत 724 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. अनेक इमारतींची पडझड झाली आहे. अनेकजण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळं उद्भवलेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यात […]

decide to start a local for all
महाराष्ट्र मुंबई

लोकल प्रवासासाठी 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढले पास, रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई : 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 11 ऑगस्टपासून एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी […]

Ulefone launches smartphone Ulefone Armor 12
गॅझेट्स तंत्रज्ञान

मस्तच..! ‘या’ कंपनीने लाँच केला पडल्यावरही न फुटणारा स्मार्टफोन, यूजर्सला ठेवणार बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित..

नवी दिल्ली :  Ulefone कंपनीने Ulefone Armor 12 या स्मार्टफोनला मजबूत बॉडीसह लाँच केले आहे. त्यामुळे या फोनला आर्मर असे नाव देण्यात आले आहे. या फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये सिल्वर-इयॉन बेस्ट ऐडिटिव्हसवर आधारित एक अँटी बॅक्टेरियल कोटिंग आहे. जे यूजर्सला बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते. आर्मर १२ चे स्पेसिफिकेशन्स :  Ulefone Armor 12 मध्ये […]

Pune Zika Virus : Condoms Distributed By Administration To Belsar Villager
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील गावात मोफत वितरित केले जाताय कंडोम, महिलांना 4 महिने गर्भधारणेपासून दूर राहण्याचा सल्ला

पुणे : पुण्याच्या 75 गावांमध्ये झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या गावांमध्ये लसीकरणाला गती देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, पुण्यातील बेलसर गावामध्ये झिका विषाणूचा धोका कमी करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला जात आहे. पंचायतीने गावातील महिलांना 4 महिने गर्भधारणेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी आरोग्य विभागाची टीम घरोघरी जाऊन त्यांचे समुपदेशन करत […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, […]

The 11th admission website Inauguration by School Education Minister Varsha Gaikwad
महाराष्ट्र शैक्षणिक

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन, आजपासून पहिल्या फेरीची सुरूवात

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार […]