In Nanded Child Died Due To Fear Of Monkey
महाराष्ट्र

भीतीने घेतला चिमुकल्याचा बळी, माकड अंगावर येऊन बसले आणि…

नांदेड : नांदेडमध्ये मुदखेड तालुक्यातील बारड गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. माकडाबद्दल वाटणाऱ्या भीतीमुळे एका १० वर्षीय चिमुकल्याचा बळी गेला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वीर नागेश संगेवार हा १० वर्षांचा मुलगा घरासमोर खेळत होता. त्यावेळी अचानक एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. अंगावर माकड बसल्याने वीर खूप घाबरला. त्याने […]

Vijay Mallya's assets worth Rs 14 crore seized in France
महाराष्ट्र मुंबई

अखेर फरार व्यावसायिक विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस विकले…

मुंबई : अखेर फरार व्यावसायिक विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस विकले गेले आहे. सध्या बंद असलेली मल्ल्याच्या मालकीची विमान कंपनी किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय ‘किंगफिशर हाउस’चा लिलाव झाला आहे. ही इमारत ५२.२५ कोटींना हैदराबादस्थित खाजगी विकासक सॅटर्न रियल्टर्स यांना विकण्यात आली आहे. किंगफिशर हाऊस कर्जवसुली न्यायाधिकरणाने (DRT) विकले. बाजारभावानुसार ‘किंगफिशर हाउस’ची मूळ किंमत १५० कोटी इतकी […]

Madhya Pradesh tragic Accident While Putting Flag On Maharajas Building 3 Employees Killed, One Injured
देश

राष्ट्रध्वजाची दोरी बदलताना क्रेनचा जॅक तुटला, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

ग्वालियर : ग्वालियरमध्ये महाराजा बाडा येथील जुन्या पोस्ट ऑफिसवर तिरंगा लावताना मोठा अपघात झाला. शनिवारी सकाळी ग्वालियरमधील 60 फूट उंच पोस्ट ऑफिस इमारतीत राष्ट्रध्वजाची दोरी बदलत असताना हा अपघात झाला. यामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्वजाची दोरी बदलण्यासाठी कामगार क्रेनवर चढले होते. त्याचवेळी अचानक क्रेनचा जॅक […]

Appeal to stop using plastic, paper national flags
महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्ट, […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र शैक्षणिक

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर

मुंबई : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात देखील बहुतांश भागात मार्च, २०२० पासून ब-याच कालावधीसाठी शाळा […]

Data Care Corporation distributes raincoats to police at Deccan Police Station
कोरोना पुणे महाराष्ट्र

डाटा केअर कार्पोरेशन कंपनीकडून पोलिसांना पावसाळी रेनकोटचे वाटप!

पुणे : डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या प्रयत्नातून डेक्कन परिसरात असलेले डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी) कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्या सहयोगाने डेक्कन पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना 150 पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी उभे राहिले. […]

court order
महाराष्ट्र मुंबई

जबरदस्ती लैंगिक संबंधांमुळे महिलेला अर्धांगवायू, न्यायालय म्हणते- पत्नीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध बेकायदेशीर नाही

मुंबई : वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांमध्ये (पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे) 7 दिवसात देशातील दोन न्यायालयांचे वेगवेगळे निर्णय आले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की वैवाहिक बलात्कार क्रूरता आहे आणि घटस्फोटासाठी आधार ठरू शकते. मात्र, मुंबई शहर अतिरिक्त सत्र न्यायालयाने म्हटले आहे की पत्नीच्या इच्छेविरुद्ध संभोग करणे बेकायदेशीर नाही. मुंबईतील […]

baby is crushed by lift
ग्लोबल

भयंकर! दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट सुरु झाली, आईने बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…

पॅरिस : लिफ्टमध्ये अडकून एका बाळाचा आईच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला. ही घटना तेव्हा घडली जेव्हा महिला आपल्या बाळाला घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करत होती. मात्र, दरवाजा बंद होण्यापूर्वीच लिफ्ट वरच्या मजल्यावर जाऊ लागली आणि बाळ लिफ्टमध्ये अडकून चिरडले गेले. महिलेने बाळाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु, ती बाळाला वाचवू शकली नाही आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू, कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेऊनही महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिलेने कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या या महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला असून मुंबईत डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू आहे. मधुमेहासह अन्य […]

Fugitive education officer Vaishali Zankar appeared at the bribery office two days later
नाशिक महाराष्ट्र

फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर दोन दिवसांनंतर लाचलुचपत कार्यालयात हजर

नाशिक : आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या चौकशीनंतर फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी वैशाली झनकर लाचलुचपत कार्यालयात स्वतः हजर झाल्या आहेत. अटक पूर्व जामिनावर सुनावणी होण्यापूर्वी त्या एसीबी कार्यालयात दाखल झाल्या. आता त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल. एका शिक्षण संस्थेच्या चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. या मंजूर अनुदानाप्रमाणे […]