सौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची जोड देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस . देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एक सामान्य मुलगी ते बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अय्यापान आहे जे पेशाने वकील आहेत. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दूध आणि केळी एकत्रितपणे खाताय? याचे शरीरावर काय परिणाम होतात जाणून घ्या…
केळामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात. फायबरने समृद्ध असलेली केळी ऊर्जा तर देतेच, पण त्याबरोबरच शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. त्याचबरोबर दुधापासून शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळते. पण दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीराला अधिक पोषण मिळते का? विशेषत: वजन वाढवण्यासाठी लोक अनेकदा दूध-केळी खाण्याची शिफारस करतात. दूध आणि केळी मिसळून बनाना शेक आणि […]
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार…
मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत. शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे […]
राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, पण ऑक्सिजनची गरज वाढल्यास तात्काळ घोषित होणार कडक लॉकडाऊन
मुंबई : राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात १५ […]
नात्यांना काळिमा! सात वर्षांच्या चिमुकलीवर आजोबा, मामा आणि मामेभावाने केला बलात्कार
चेन्नई : चेन्नईमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिचे आजोबा, मामा आणि मामाचा मुलगा या तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईच्या मडीपक्कमची आहे. […]
दि. ११ ऑगस्ट २०२१ : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
अनाथांच्या एक टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवली अनाथ मुलांना शिक्षण व नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याच्या धोरणात बदल करून आता तीनही वर्गातील अनाथांना शिक्षण आणि नोकरीत तसेच आरक्षण देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अनाथांचे ‘अ’ ‘ब’आणि ‘क’ अशा तीन प्रवर्गात वर्गीकरण करुन तिन्ही प्रवर्गातील अनाथ मुलांना […]
चिंतेत भर! राज्यात आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले
मुंबई : कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे […]
निर्बंधात शिथिलता असली तरी जबाबदारी मात्र वाढली आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचे आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण निर्बंध शिथिल केले असेल आणि तिसरी लाट येणार की येणार […]
ATM मध्ये कॅश नसेल तर बँकांना भरावा लागणार दंड
नवी दिल्ली : एटीएम मशिनमध्ये पैसे नसतील तर ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी आता एटीएममध्ये पैसे नसतील तर संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी ही घोषणा केली असून हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आरबीआयने यासंबंधी एक निवेदन जारी केलं असून […]
व्यंकय्या नायडू झाले भावूक, विरोधकांच्या गदारोळावर व्यक्त केली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्याची सुरुवात देखील गोंधळाने झाली. लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं असून काल राज्यसभा सभापतींवर पुस्तक भिरकावल्याच्या घटनेची सभापती व्यंकय्या नायडू यांनी निंदा केली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यावेळी भावूक झालेले दिसले. सदनात काल झालेल्या घटनेवर सभापतींनी निराशा व्यक्त केली. विरोधी पक्ष […]










