start all the educational admissions which were delayed due to the postponement of Maratha reservation
महाराष्ट्र मुंबई

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई हायकोर्टाकडून रद्द

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता हा जीआर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांच्याच आधारे केले जावेत, असे निर्देश मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि नववी, दहावीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून निकाल […]

Ayurvedacharya Balaji Tambe passes away
पुणे महाराष्ट्र

दुःखद! आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे आज (१० ऑगस्ट) निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक […]

The Vegetable Festival
महाराष्ट्र

रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल- कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

सांगली : पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभागाने आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली. जिल्हा […]

Considering the new challenges, we will meet the needs of the Maharashtra Police Academy
नाशिक महाराष्ट्र

नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे […]

ग्लोबल

संतापजनक! फक्त ११ मिनिटेच बलात्कार झाल्याचे सांगून न्यायालयाने कमी केली आरोपीची शिक्षा

बर्न : फक्त ११ मिनिटेच बलात्कार केल्याचे म्हणत बलात्कार करणाऱ्या आरोपीची शिक्षा न्यायालयाने कमी केल्याचे संतापजनक प्रकरण समोर आले आहे. एका महिला न्यायाधीशाने हा निकाल दिला आहे. स्वित्झर्लंडमधील न्यायालयाने हा निकाल दिला असून या निकालानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका नाइट क्लबमध्ये ही घटना घडली होती. पीडित […]

pune girl falls off from building terrace gets stuck in grill rescued by fire brigade
पुणे

अनर्थ टळला! मुलगी इमारतीच्या छतावरून खाली कोसळली, पण प्रसंगावधान राखल्याने वाचला जीव…

पुणे : इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी ऋतुजा जगदाळे हिचे घर पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये आहे. ती आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केस वाळवायला इमारतीच्या छतावर गेली होती, त्यावेळी अचानक ती पाय घसरून खाली कोसळली. मात्र, सुदैवाने खाली कोसळताना तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या ग्रीलला पकडले. त्यानंतर, या मुलीला वाचवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा जगदाळे हिचे […]

How to get QR pass which is mandatory for local travel?
महाराष्ट्र मुंबई

लोकल प्रवासासाठी अनिवार्य केलेला क्यू-आर पास कसा काढायचा? जाणून घ्या…

मुंबई : सरकारकडून काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलमध्ये देखील सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक आहे. लसीचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच रेल्वे पास मिळणार आहे. हा रेल्वे पास नेमका कसा काढायचा या बद्दल जाणून घेऊयात. रेल्वे पास कसा काढायचा? ऑफलाईन आणि ऑनलाईन या […]

BSF GD constable recruitment 2021 online application started
काम-धंदा देश

दहावी पास झालेल्यांसाठी सीमा सुरक्षा दलात भरतीची मोठी संधी

BSF Constable GD Recruitment २०२१ : केंद्र सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत सीमा सुरक्षा बलाने (BSF) नॉन-गजेटेड आणि नॉन-मिनिस्ट्रियल कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. BSF द्वारे एकूण २६९ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. ही […]

old man got angry due to snake bite in bihar nalanda said how dare you and was chewed
देश

मला चावण्याची हिम्मत कशी झाली? असे विचारत वृद्धाने सापाला चावून चावून मारून टाकलं, मग…

बिहार : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीला साप चावला, त्यानंतर नशेत असलेल्या त्या वृद्धाने सापाला चावून चावून मारून टाकलं. त्यानंतर या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. रामा महतो (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो नालंदाच्या चंडी पोलीस स्टेशन परिसरातील माधोपुर डीह गावचा रहिवासी होता. सर्पदंशाने मृत्यू झाल्याची […]

cm uddhav thackeray if the corona rules are not followed action will be taken
महाराष्ट्र मुंबई

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवासास मुभा, मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती…

मुंबई : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक […]