pune girl falls off from building terrace gets stuck in grill rescued by fire brigade
पुणे

अनर्थ टळला! मुलगी इमारतीच्या छतावरून खाली कोसळली, पण प्रसंगावधान राखल्याने वाचला जीव…

पुणे : इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी ऋतुजा जगदाळे हिचे घर पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये आहे. ती आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केस वाळवायला इमारतीच्या छतावर गेली होती, त्यावेळी अचानक ती पाय घसरून खाली कोसळली. मात्र, सुदैवाने खाली कोसळताना तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या ग्रीलला पकडले. त्यानंतर, या मुलीला वाचवण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा जगदाळे हिचे वडील वॉचमन आहेत. गेल्या सहा वर्षापासून ते शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये राहतात. ऋतुजा सकाळी केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली होती. यावेळी ती टेरेसवरील ग्रीलशेजारी उभी राहिली होती. मात्र अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. मात्र, सुदैवाने खाली कोसळताना तिच्या हातात तिसऱ्या मजल्यावरील ग्रील आली आणि तिने या ग्रीलला गच्च पकडून ठेवलं. त्यानंतर ती जोरजोराने रडू लागली. तिच्या वडिलांनी तिचा आवाज ऐकला आणि त्यानंतर झालेला प्रकार त्यांच्या लक्ष्यात आला. त्यानंतर या मुलीला खाली उतरवण्यासाठी वरून साडी टाकण्यात आली. पण तिला वाचवण्यात अडथळे येत होते. शेवटी अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी या मुलीला खाली उतरवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत