ग्लोबल

संतापजनक! फक्त ११ मिनिटेच बलात्कार झाल्याचे सांगून न्यायालयाने कमी केली आरोपीची शिक्षा

बर्न : फक्त ११ मिनिटेच बलात्कार केल्याचे म्हणत बलात्कार करणाऱ्या आरोपीची शिक्षा न्यायालयाने कमी केल्याचे संतापजनक प्रकरण समोर आले आहे. एका महिला न्यायाधीशाने हा निकाल दिला आहे. स्वित्झर्लंडमधील न्यायालयाने हा निकाल दिला असून या निकालानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका नाइट क्लबमध्ये ही घटना घडली होती. पीडित महिलेवर ३३ वर्षीय आणि १७ वर्षीय दोघांनी बलात्कार केला. त्यातील १७ वर्षीय आरोपीवर बाल न्यायालयात खटला सुरू आहे. मागील महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटले की, पीडित महिलेने दोषीला ‘काही संकेत’ही दिले होते. निकालानंतर कोर्टाच्या प्रवक्त्यांनी हे वक्तव्य स्पष्ट करण्यास नकार दिला. न्यायालयाने बलात्कार फक्त ११ मिनिटे झाला आणि पीडिता गंभीर जखमी झाली नाही. या मुद्यावर दोषीची शिक्षा कमी केली. या निकालानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोर्टाच्या या निकालामुळे धक्का बसला असल्याचे पीडितेच्या वकिलाने म्हटले.

दरम्यान, या निकालाच्या विरोधात स्वीस अपील न्यायालयाच्या बाहेर रविवारी शेकडो निदर्शकांनी आंदोलन केले. रविवारी झालेल्या निदर्शनांमध्ये महिलांनी संताप व्यक्त केला. याआधी दोषीला चार वर्षे आणि तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कोर्टाने ३३ वर्षाच्या दोषीची शिक्षा कमी करून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. बलात्कार प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा होणे अपेक्षित असताना न्यायालयाने अशी भूमिका घेणे धक्कादायक असल्याचे काही आंदोलकांनी म्हटले होते. या निकालाविरोधात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत