Vijay Mallya's assets worth Rs 14 crore seized in France

अखेर फरार व्यावसायिक विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस विकले…

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : अखेर फरार व्यावसायिक विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस विकले गेले आहे. सध्या बंद असलेली मल्ल्याच्या मालकीची विमान कंपनी किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय ‘किंगफिशर हाउस’चा लिलाव झाला आहे. ही इमारत ५२.२५ कोटींना हैदराबादस्थित खाजगी विकासक सॅटर्न रियल्टर्स यांना विकण्यात आली आहे. किंगफिशर हाऊस कर्जवसुली न्यायाधिकरणाने (DRT) विकले. बाजारभावानुसार ‘किंगफिशर हाउस’ची मूळ किंमत १५० कोटी इतकी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही मालमत्ता किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्य कार्यालय आहे. मल्ल्याची विमान कंपनी आता बंद झाली आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांकडे कंपनीचे सुमारे 10 हजार कोटी रुपये देणे आहे. मालमत्तेचे क्षेत्रफळ 1,586 चौरस मीटर आहे, तर भूखंड 2,402 चौरस मीटर आहे. कार्यालयाच्या इमारतीत तळघर, तळमजला, वरचा तळमजला आणि वरचा मजला आहे.

याआधी, किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देणाऱ्या 10,000 कोटींपैकी 7,250 कोटी रुपये कर्जदारांनी विजय मल्ल्याचे शेअर्स विकून वसूल केले होते. 23 जून 2021 रोजी झालेल्या या लिलावात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांनी युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅकडोनाल्ड होल्डिंग्स लिमिटेडमध्ये मल्ल्याचे शेअर्स विकले. यामध्ये रिकव्हरी ऑफिसरने 4.13 कोटी युनायटेड ब्रेवरीज, 25.02 लाख युनायटेड स्पिरिट्स आणि ब्लॉक डीलमध्ये मॅकडोनाल्ड होल्डिंग्जचे 2.2 दशलक्ष शेअर्स विकले.

बाजारभावानुसार ‘किंगफिशर हाउस’ची मूळ किंमत १५० कोटी इतकी आहे. २०१६ साली या इमारतीचा पहिल्यांदा लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावासाठी इमारतीची बेस प्राइस १३५ कोटी ठेवण्यात आली होती. मात्र, खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर आठ वेळा प्रयत्न करूनही इमारत विकली गेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या लिलावात इमारतीची बेस प्राइस ५४ कोटींपर्यंत खाली आणण्यात आली होती. तरीही कोणी ही इमारत खरेदी करण्यात रस दाखवला नाही. मार्च महिन्यात या इमारतीसाठी नववा लिलाव झाला होता. तेव्हा सॅटर्न रिअल्टर्सनं ५२ लाखांची बोली लावली होती. अखेर ५२.२५ कोटींना इमारत विकण्यात आली आहे.

किंगफिशर हाऊसचे स्थान विलेपार्ले, मुंबई विमानतळाजवळ आहे. रिअल्टी तज्ज्ञांच्या मते, ही मालमत्ता सध्या मुंबई विमानतळाच्या बाहेरील भागात असल्याने ती विकसित करण्यास वाव नाही. विजय मल्ल्याची विमान कंपनी किंगफिशर एअरलाइन्स 2012 पासून बंद आहे. मल्ल्याला विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आले आहे.

26 जुलै रोजी यूके कोर्टाने विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले. या आदेशामुळे भारतीय बँका आता मल्ल्याची जगभरातील मालमत्ता सहज जप्त करू शकतील. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या संघाने मल्ल्याविरोधात ब्रिटिश न्यायालयात याचिका दाखल केली. मल्ल्याला लंडन उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची संधी नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत