sudhir mungantiwar
कोरोना महाराष्ट्र राजकारण

जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना कोरोना

मुंबईः  महाराष्ट्राचे जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी जात होते. अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारी कामकाजाचा आढावा घेतला होता. कोरोना संकटावर सुरू असलेल्या सरकारी उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. या काळात ते अनेकांच्या संपर्कात आले होते. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही कोरोना झाला आहे. कोरोना झाल्याचे लक्षात येताच बच्चू कडू तातडीने अचलपूरहून अमरावतीला गेले. तिथेच उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बच्चू कडू यांच्या पाठोपाठ राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी आपापल्या ट्विटर हँडलवर कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांनी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत असल्याचे सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत