IPL 2020, MI vs CSK

IPL २०२० : आयपीएल २०२० च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा विजय ५ विकेट राखून विजय

क्रीडा

IPL २०२० (MI vs CSK ): क्रिकेट टुर्नामेंट इंडियन प्रीमियर लीग IPL २०२० ची सुरुवात झाली, यंदा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला.  चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी मुंबई इंडियन्सने सुरुवात अतिशय धडाकेबाज केली. पण त्यानंतर म्हणावी तशी फटकेबाजी एकाही फलंदाजाला करता आली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २० ओव्हरमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १६२ धावाच करता आल्या. यावेळी सौरभ तिवारीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर डिकॉकने ३३ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे हा मुंबईचा संघ १६२ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीला फारच स्वैर मारा केला. मात्र, नंतर त्यांनी टिच्चून गोलंदाजी केली. यावेळी एन्गिडीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर चहर आणि जडेजा प्रत्येकी २-२ आणि सॅम करन आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

मुंबईच्या १६२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कारण मुरली विजय आणि शेन वॉटसन हे त्यांचे दोन्ही सलामीवीर हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसी आणि अंबाती रायडू यांनी अर्धशतकी खेळी करत टीमला विजय मिळवून दिल्या अंबाती रायडूने अवघ्या ४८ चेंडूत ७१ धावा केल्या तर प्लेसिसने देखील ५८ धावा केल्या.

चेन्नईने तब्बल ५ विकेट राखून पहिल्याच सामन्यात मुंबईवर दणदणीत विजय मिळवला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत