Rajasthan Royals
क्रीडा

बेन स्टोक्सचं दमदार शतक, राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्स विरुद्ध ८ विकेट राखून दणदणीत विजय

IPL २०२० : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाली. ही मॅच राजस्थान रॉयल्सने जिंकली आहे. राजस्थान रॉयल्सने दोन विकेट्स गमावत मॅच जिंकली आहे. मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरेल्या राजस्थान रॉयल्सचा रॉबिन उथप्पा अवघ्या 13 रन्सवर माघारी परतला. तर स्टिव्ह स्मिथ 11 रन्स करुन आऊट झाला. बेन स्टोक्स याने टीमला सावरलं. बेन स्टोक्सला संजू सॅमसन याने चांगली साथ दिली. बेन स्टोक्स याने सेंच्युरी करत टीमला विजय मिळवून दिला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बेन स्टोक्स
बेन स्टोक्स याने सेंच्युरी करत टीमला विजय मिळवून दिला

मॅचच्या सुरुवातील मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग केली . मुंबईने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत 195 रन्स केले आणि राजस्थानसमोर विजयासाठी 196 रनसचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सकडून सहाव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पांड्या याने नॉट राऊट राहत 60 रन्सची इनिंग खेळली. सूर्यकुमार यादव याने 40 रन्स केले. इशान किशन याने 37 रन्स, सौरभ तिवारीने 34 रन्स केले. क्विंटन डी-कॉक सहा रन्स आणि पोलार्ड यानेही सहा रन्स केले.

राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर याने चार ओव्हर्समध्ये 31 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. श्रेयस गोपाळ याने चार ओव्हर्समध्ये 30 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी याने एक विकेट घेतली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत