भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर आता एक गोड बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला मुलगी झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.
ट्विट करत त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. “मुलगी झाली”, असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केला आणि म्हटलं कि, “माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्या येण्याने मी खूपच आनंदी झालो आहे”
उमेश यादवचा १६ एप्रिल २०१३ ला दिल्लीची फॅशन डिझायनर तानया वाधवा हिच्याशी साखरपुडा झाला. त्यानंतर २९ मे २०१३ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर सात वर्षांनी उमेश-तानया यांना कन्यारत्न झाले.
It’s a girl. ?????? pic.twitter.com/mdorY5nBUv
— Umesh Yaadav (@y_umesh) January 1, 2021




