भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर आता एक गोड बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला मुलगी झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. ट्विट करत त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. […]

