मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील कोसंबी पेठ ता. पोंभुर्णा येथे औद्योगिक वसाहत उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या औद्योगिक वसाहतीसाठी 102.50 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून संपादनासाठी 6 कोटी 7 लाख 52 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापैकी 42.59 हेक्टर जमीन संपादनाला थेट खरेदीद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करण्यात येईल, अशी […]
टॅग: sudhir mungantiwar
वीर अमर जवानांच्या गावातील माती संकलित करणाऱ्या उमेश जाधव यांच्या उपक्रमाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक
मुंबई : “देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा उपक्रम अभिनंदनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असून “मेरी माटी, मेरी देश” या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद “राष्ट्र प्रथम” ही भावना जागृत करण्यास प्रेरक ठरत […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल – सुधीर मुनगंटीवार
जपान : ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जपान येथील कोबे शहरात भारत-जपान यांच्यातील […]
वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्य शासनाने अमृत महोत्सवी वर्षात सुरू केलेल्या पदभरती अभियानात वन विभाग अव्वल राहावा याकरिता वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या वन विभागाच्या बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. […]
यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनेक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार राजकारण्यांच्या हस्ते देण्याऐवजी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे कुटुंबीय यांच्या हस्ते राज्याची शान असलेल्या या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या सांस्कृतिक खात्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. […]
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : मराठी ही आपली मातृभाषा आहे तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग दैनंदिन वापरात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी हिंदी साहित्यिक डॉ. शीतलाप्रसाद दुबे आणि आनंद सिंह यांच्यासह […]
जळगावच्या महिला वसतीगृहात झालेल्या ‘त्या’ संतापजनक प्रकारावरून विधानसभेत चर्चा, जाणून घ्या प्रकरण..
जळगावच्या महिला वसतीगृहात पोलिसांनी महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संतापजनक प्रकारची दखल आज विधीमंडळात घेण्यात आली. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावून त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की संबंधित पोलिसांचं […]
भरधाव कार पुलाखाली पडून भीषण अपघात, सुधीर मुनगंटीवार यांची बहीण आणि भावोजी यांचा जागीच मृत्यू
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भावोजी यांचा अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार पुलाखाली पडून भीषण अपघात झाला. मृत दाम्पत्य पुसद येथून पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. तिंतरवणी येथे ही गाडी भरधाव असल्याने पुलाखाली पडून अपघात झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. या […]
जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना कोरोना
मुंबईः महाराष्ट्राचे जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी जात होते. अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारी कामकाजाचा आढावा घेतला होता. कोरोना संकटावर सुरू असलेल्या सरकारी उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. या काळात ते अनेकांच्या संपर्कात आले होते. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही कोरोना झाला आहे. कोरोना […]








