A car crashed into a well in Jalna
महाराष्ट्र

भरधाव कार पुलाखाली पडून भीषण अपघात, सुधीर मुनगंटीवार यांची बहीण आणि भावोजी यांचा जागीच मृत्यू

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भावोजी यांचा अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार पुलाखाली पडून भीषण अपघात झाला. मृत दाम्पत्य पुसद येथून पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. तिंतरवणी येथे ही गाडी भरधाव असल्याने पुलाखाली पडून अपघात झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी गेवराई तालुक्यातील चकलांबा गावानजीक भरधाव कार पुलावरुन खाली पडून भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार या दाम्पत्यांचा मृत्यू झाला आहे. मृत दाम्पत्य भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण व भावोजी असल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत