Discussion on Jalgaon hostel women's atrocities in the assembly

जळगावच्या महिला वसतीगृहात झालेल्या ‘त्या’ संतापजनक प्रकारावरून विधानसभेत चर्चा, जाणून घ्या प्रकरण..

महाराष्ट्र

जळगावच्या महिला वसतीगृहात पोलिसांनी महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संतापजनक प्रकारची दखल आज विधीमंडळात घेण्यात आली. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावून त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की संबंधित पोलिसांचं निलंबन करावं, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली. यावर गृहमंत्र्यांनी ‘नोंद घेतो’ एवढंच उत्तर दिलं. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली.

सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त करत म्हटलं कि, “सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणा…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो.”

मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे. गृहमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं कि, “जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियमानुसार दोषींवर कारवाई होईल.”

काय आहे प्रकरण ?

जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही पोलिसांनी कपडे काढून डान्स करायला लावल्याचा प्रकार घडला. या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या महिलांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे.

इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यावर आपण चौकशी समिती गठीत केली असून ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपास करून अहवाल देणार आहे. या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत