The 11th admission website Inauguration by School Education Minister Varsha Gaikwad

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन, आजपासून पहिल्या फेरीची सुरूवात

महाराष्ट्र शैक्षणिक

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून होणार असून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल, त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. २३ ते २५ ऑगस्टदरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते ३० ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.

दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत