Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्र

मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. सोमवारी (१६ ऑगस्ट) पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत