अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली. कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील […]
टॅग: IMD
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी […]
पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित
मुंबई : राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून SACHET platform चा वापर करून मागील […]
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु
मुंबई : १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. […]
पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस
मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी, […]
पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढण्याचा आयआयटीएमचा इशारा
पुणे : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (IITM) संचालक डॉ. आर. कृष्णन यांनी सोमवारी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीवर आणि शहरीकरणामुळे होणाऱ्या हवामानातील बदलांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले, “अलिकडच्या काही वर्षांत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अल्पावधीतच मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे पूर येणे आणि भूस्खलन होते, असे निदर्शनास आले आहे. […]
पुण्यात उष्णतेचा कहर! पुण्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, IMD कडून काळजी घेण्याचे आवाहन
पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या उष्ण आणि कोरड्या हंगामानंतर, पुण्यात मार्च महिना नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. IMD ने आपल्या हंगामी अंदाजात म्हटले आहे की, मार्च महिना देशाच्या बहुतेक भागांसाठी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहणार आहे, आणि महाराष्ट्राच्या विविध भागांसाठीही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पुण्यात, जिथे ऐतिहासिकदृष्ट्या मार्चमध्ये तापमान […]
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या ४८ तासात ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने येत्या ४-५ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी, ‘या’ जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला […]
राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 3-4 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात अनेक […]










