मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 3-4 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात सर्वाधिक प्रभाव राहणार असून कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाची शक्यता 6-9 सप्टेबर २०२१ pic.twitter.com/5tUrGwYOjH
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 6, 2021
पुढील 3-4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्यामुळे IMD ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड ह्या चौदा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे वेगवान वारे देखील वाहतील.
IMD ने आज दिलेल्या इशा-या नुसार,पुढच्या 3,4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.ह्याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा,मध्य महाराष्ट्र,कोकणात राहील. कोकणात काही ठिकाणी अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे,पालगर रायगड जास्त प्रभावीत राहिल Reduction after 9 Sept pic.twitter.com/eR2o4ySEIv
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 6, 2021