मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३-४ तासांमध्ये पालघर आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 तासांत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि पुण्यातील घाट भागात मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Nowcast warning issued at 1400 Hrs IST dated 08.09.2021 :
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of #Nashik, #Nandurbar, #Dhule, Jalgaon and Ghat areas of #Pune during next 3-4 hours. -IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 8, 2021
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे इ. सहीत उर्वरित ठिकाणी उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार आहे. मात्र, परत 4,5 दिवसापासून कोकणात इशारे देण्यात आले आहेत.
8 Sept, राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी, IMD ने मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारे आज दिले आहेत. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ओरेंज इशारे;मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी नाशिक पुणे इ. सहीत
उद्या पासून तीव्रता कमी.
?? परत 4,5 दिवसा पासून कोकणात इशारे दिले आहेत pic.twitter.com/PDgWX15z1g— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 8, 2021




