पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या ४८ तासात ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने येत्या ४-५ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून आज पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तीव्र (depression) होण्याची व वेस्ट-नॉर्थवेस्ट दिशेने येत्या २,३ दिवसात सरकण्याची शक्यता आज IMD ने वर्तवली. परिणामी राज्यात येत्या ४,५ दिवसात काही ठिकाणी मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे सहीत (१२-१४) pic.twitter.com/pFuwMLE6eC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 11, 2021




